शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी’प्रमाणेच साखरेची कायद्याने किंमत निश्चित करा प्रकाश नाईकनवरे : साखर संघाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:36 IST

कोल्हापूर : साखरेचे दर पडल्याने ‘एफआरपी’चा प्रश्न गंभीर बनला आहे. एकूणच, साखर उद्योग आणि ऊस उत्पादक अडचणीत सापडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन ‘एफआरपी’प्रमाणे साखरेचीही

कोल्हापूर : साखरेचे दर पडल्याने ‘एफआरपी’चा प्रश्न गंभीर बनला आहे. एकूणच, साखर उद्योग आणि ऊस उत्पादक अडचणीत सापडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन ‘एफआरपी’प्रमाणे साखरेचीही किंमत कायद्याने निश्चित करावी, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात राज्य साखर संघातर्फे आयोजित साखर कारखान्यांचे अध्यक्ष, प्रतिनिधी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उसाची एफआरपी ठरविताना साखरेची विशिष्ट किंमत गृहीत धरली जाते. या किमतीपेक्षा कमी दराने साखरेची विक्री झाल्यास ‘एफआरपी’चा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे कृषिमूल्य आयोगाने एफआरपी ठरविताना गृहीत धरलेल्या दरापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करू नये. यासाठी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कलम ३ नुसार आदेश काढावा, असे मत प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

प्रमुख उपस्थिती राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, आमदार चंद्रदीप नरके, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी साखर उद्योगातील सद्य:स्थितीबाबत विस्तृत विवेचन केले.साखरतज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी उद्योगातील अडचणींवरील उपाययोजनेबाबत सूचना मांडल्या. राज्य बॅँकेने साखर मूल्यांकनात घट केल्याने कारखान्यांना पुरेशी रक्कम उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत. ‘एफआरपी’चा तिढा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अशा भावना कारखान्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.साखरजप्तीची घाई करू नयेसाखरेचे दर घसरल्याने काही कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे. अशा कारखान्यांमधील साखर जप्त करून एफआरपीचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे साखर जप्त करण्याच्या कारवाईची घाई करू नये, अशी अपेक्षा संजय खताळ यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवार